मोदींना पंतप्रधान करण्यासाठी थोडा त्याग करा; भाजपातील नाराजांना देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

213
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी थोडा त्याग करा; भाजपातील नाराजांना देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी थोडा त्याग करा; भाजपातील नाराजांना देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

पारंपरिक विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार युती सरकारमध्ये सामिल झाल्याने शिवसेनेसोबत भाजपाचे आमदारही नाराज आहेत. परंतु, प्राप्त परिस्थितीत महाविकास आघाडी फोडणे आवश्यक होते. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी थोडा त्याग करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या आमदारांना केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या आमदारांची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. यावेळी त्यांनी आमदारांशी संवाद साधला. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला त्याग करावाच लागेल, असे त्यांनी आमदारांना स्पष्टपणे सांगितले. फडणवीस म्हणाले, राज्यातील सद्यस्थितीत पाहता बेरजेचे राजकारण आवश्यक आहे. महाविकास आघाडी तुटणे आपल्यासाठी अत्यावश्यक होते. ३ पक्षांची एकत्रित ताकद अडचणीची ठरणार होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले, असे स्पष्ट करीत फडणवीसांनी आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – अखेर राम पावला! चित्रपट प्रदर्शनाच्या २३ दिवसांनंतर लेखकाने मागितली जाहीर माफी)

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पद अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे येत्या काळात त्यागाची तयारी ठेवा, हे सर्वांना यापूर्वीच सांगण्यात आले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करा. त्यानंतर येणारा काळ आपलाच असेल, असे ते म्हणाले.

भाजपा पक्ष फोडत नाही. पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी येत असेल, तर त्याला सोबत घेण्यास विरोध करू नका. मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा. सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही फडणीसांनी यावेळी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.