परभणीतल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) भाषणाआधी देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) भाषण झालं. या भाषणात फडणवीसांनी महादेव जानकरांचं कौतुक करताना राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्याच त्यांच्याकडे असल्याचं विधान केलं. परभणीमध्ये (parbhani) महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. जानकरांच्या शिट्टी या चिन्हासोबतच परभणीतील बॅनर्सवर भाजपाचं कमळ दिसत होतं. या शिट्टीबाबत बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “महादेव जानकरांचं चिन्ह शिट्टी आहे. शिट्टीचं बटण दाबलं की मतदान मोदींना मिळतं.” असं फडणवीस यावेळी म्हणाले. (Devendra Fadnavis)
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) परभणीबाबत बोलल्या जाणाऱ्या विधानांचा उल्लेख करत त्यात बदल केला. “आजपर्यंत आपण म्हणायचो, ‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी’. पण पुढच्या पाच वर्षांत भारतच जर्मनीच्या पुढे चाललाय. काही लोक असंही म्हणतात की, ‘बनी तो बनी, नहीं तो परभणी’. आता तसं चालणार नाही. ‘बनी तो बनी, अभीही बनी और बनेगी तो परभणी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या तिजोरीची किल्ली असल्याचं विधान केलं. “महादेव जानकर म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी जानकरांचा शब्द टाळूच शकत नाही. जानकरांना निवडून दिलं की महाराष्ट्राची किल्ली हातात आली. भविष्यात दिल्लीच्या तिजोरीच्या किल्ल्याही जानकरांच्या हाती असतील.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
हे पहा –
Join Our WhatsApp Community