रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस!

आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा.अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली.

1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात

संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा.अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली.

दरम्यान, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेद्वारे अनेकदा भाजप कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच आयोजित करण्यात आलेल्या अशा अभ्यासवर्गाला राज्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here