नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटील संघटनेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं. मी राज्याचा गृहमंत्री आहे मात्र पोलीस पाटील हे त्यांच्या त्यांच्या गावाचे गृहमंत्रीच आहात हे विसरु नका असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला याचं समाधान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काही लोकांचा शौक असा आहे की सकाळी उठून कॅमेरासमोर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही. एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होतं. पण पोलीस पाटील संघटना अशी आहे की ज्यांनी मागे लागून त्यांचं काम करुन घेतलं. पण कुणी काम केलं ते ही संघटना विसरली नाही. आज मला इथे बोलवून माझा सत्कार केलात त्याबद्दल आपले आभार मानतो.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.
(हेही वाचा –Assam सरकारचा मोठा निर्णय! नमाज पठणासाठी मिळणारी २ तासांची सुट्टी आता बंद)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या सरकारमध्ये काम चालतं फाईल गोगलगायीच्या गतीने चालते. गोगलगायीच्या पावलाने फाईल चालली की आम्हाला धक्का द्यावा लागतो. तसा आज धक्का मी दिला आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलं आहे की म्हणोनी गावी अन्याय केला त्याचा प्रतिकारच झाला पाहिजे. दुष्टाशी दया करुनी सोडुनी द्यावे नसे हा धर्म. कुठल्याही गरीबाला त्रास झाला तर त्रास देणाऱ्याला शासन झालं पाहिजे.” असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community