मुख्यमंत्री म्हणतील म्हणून, नळातून येणा-या हवेला पाणी समजा! फडणवीसांचा हल्लाबोल

93

संभाजीनगरमधील पाणी प्रश्नावरुन आता भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. संभाजी नगरमधील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही, तोपर्यंत आपण शांत बसणार नसल्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यासाठी संभाजी नगरमध्ये भाजपकडून भव्य जल आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना कोणत्याच समस्येशी काही देणं घेणं नाही. ते म्हणतील पाईपला नळ समजा आणि नळातून येणा-या हवेला पाणी समजा, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

(हेही वाचाः राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार ठरला?)

मुख्यमंत्री म्हणतील म्हणून…

मुख्यमंत्र्यांना कोणत्याच समस्येशी काही देणं घेणं नाही. ते म्हणतील, मी म्हणतो म्हणून औरंगाबादला संभाजीनगर समजा
दगडाला सोन्याची नाणी समजा, पाईपला नळ समजा आणि नळातून येणार्‍या हवेला पाणी समजा, अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही व्यवस्ठा परिवर्तनाची लढाई

आजची लढाई ही सत्ता परिवर्तनाची नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वातील भ्रष्ट कारभार संपवण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत. हा भाजपचा मोर्चा नाही, तर संभाजीनगरच्या जनतेचा मोर्चा आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह यांचे राज ठाकरेंना आव्हान)

सरकार बदलले आणि…

आम्ही जेव्हा पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली, तेव्हा महापालिकेने 1 रुपया द्यावा, बाकी पूर्ण निधी राज्य सरकार देईल असा निर्णय घेतला. आता सरकार बदलले आणि 600 कोटी महापालिकेला द्यायला सांगितले, असाही खुलासा फडणवीस यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.