सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते, फडणवीसांचा राऊतांना झणझणीत टोला

76

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. तर या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विजयानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, सर्वांचे आभार मानले. तर याचवेळी त्यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः भाजपच्या ‘या’ दोन आमदारांनी जे काही केले, त्याने कांदेंचे वांदे झाले)

राऊतांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज

आमदारांना घोडे म्हणणं ही त्यांची संस्कृती असू शकते. त्यांनी जेव्हापासून घोडेबाजार म्हणायला सुरुवात केली, तेव्हापासूनच त्यांच्या आमदारांना ठरवलं की, आपल्याला घोडा म्हणणा-यांना आपली गरज नाही. संजय राऊतांपेक्षा जास्त मतं आमचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना मिळाली आहेत, याचं आत्मपरिक्षण संजय राऊत यांनी करायला हवं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सत्ता येते, जाते पण ती इतक्या डोक्यात जाऊन द्यायची नसते, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे.

(हेही वाचाः शिवसेनेला ‘कांदे’ महागात पडले, या कारणांमुळे बाद झाले मत)

मलिक-कांदेंच्या मतांनी काही फरक पडला नसता

सुहास कांदे आणि नवाब मलिक यांच्या मतांवरुन आता महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करत आहेत. त्यालाही फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मलिक आणि कांदे हे या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले तरी त्याने काहीही फरक पडणार नाही. सुहास कांदे आणि नवाब मलिक यांचं मतदान झालं असतं तरीही मतांचा फरक इतका आहे की काहीही झालं असतं तरी आमचा उमेदवार विजयी झाला असता, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.