तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणणार, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा

78

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी झालेल्या सभेतून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

माझं राजकीय वजन कमी करू शकाल पण…

देवेंद्र फडणवीस यांनी नुसता पाय ठेवला असता तरी त्यांच्या वजनाने बाबरी ढाचा खाली आला असता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, त्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे तो बघा. आज माझं वजन 102 किलो आहे, ज्यावेळी मी बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल. पण लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

(हेही वाचाः मास्टर कसली, ती तर लाफ्टर सभा! फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा)

वजनदार लोकांपासून सावध रहा

बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. त्यामुळे वजनदार लोकांपासून सावध रहा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

(हेही वाचाः फडणवीसांच्या सभेत राज ठाकरे झाले उद्धव ठाकरेंचे पुतणे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.