शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. राज्यात कंत्राटी भरतीचं १०० टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यामुळे हे पाप आपल्या माथी नको असं सांगत फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. अशी माहिती शुक्रवारी (२०ऑक्टोबर) झालेल्या फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Devendra Fadnavis)
शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे.
(हेही वाचा : Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे वानखेडे स्टेडियमवर या दिवशी होणार अनावरण)
कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर १३ मार्च २००३ रोजी काढण्यात आला. त्यावेळीच्या काँग्रेस आणि त शरद पवारांच्या सराकरमध्ये कंत्राटी भरती झाली. २०१० साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. सहा हजार कंत्राटी पदाचा जीआर काढण्यात आला. २०११ साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. २०१३ सालीही अशीच भरती काढण्यात आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. मात्र हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत,’ असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.
हेही पहा –