साधू मारहाण प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन, मागवला अहवाल

73

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसात संपूर्ण देशभरात उमटत आहेत. यानंतर या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना थेट रशियावरून फोन केला आणि त्यांच्याकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. फडणवीस यांनी रशिया दौऱ्यादरम्यान सेठ यांच्याकडून फोनवर थोडक्यात आढावा घेतला.

(हेही वाचा – ‘वेदांता प्रकल्प’ महाराष्ट्रात होताच कधी?, ‘या’ प्रकरणाची चौकशी व्हावी, शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)

फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण गंभीर प्रकरण असून तुम्ही स्वत: या प्रकरणाकडे लक्ष द्या, तपास कसा सुरू आहे, मारहाण करणारे कोण होते, व्हिडिओ व्हायरल कसा झाला याचा संपूर्ण अहवाल द्या, अशा सूचना दिल्या आहेत.

काय आहे पार्श्वभूमी

उत्तर प्रदेशमधील चार साधूंना पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाताना जत तालुक्यातील लवंगा परिसरातील ग्रामस्थांनी गैरसमजातून बेदम मारहाण केली होती. मुले चोरणारी टोळी असल्याची संशयावरून ही मारहाण झाली होती. चारचाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एकूण २५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. अटकेत असलेले आमसिद्धा तुकाराम सरगर आणि लहु रकमी लोखंडे हे दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आमसिद्धा सरगर हा लवंगा गावच्या काँग्रेसच्या सरपंच बायक्का तुकाराम सरगर यांचा मुलगा आहे आणि लहू लोखंडे हा माजी सरपंच आहे. याशिवाय सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार व शिवाजी सिधराम सरगर अशी अटकेतील अन्य लोकांची नावे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.