Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून बीड आणि परभणी प्रकरणात कुटुंबियांना दिलासा

80
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून बीड आणि परभणी प्रकरणात कुटुंबियांना दिलासा
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून बीड आणि परभणी प्रकरणात कुटुंबियांना दिलासा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये बीड (Beed) आणि परभणी (Parbhani) प्रकरणांमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या दोन्ही घटनेतील पीडित कुटुंबियांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे देशमुख यांची मुलं लहान असल्याने संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) घेतला आहे.

हेही वाचा-गाईला राष्ट्रमातेच्या दर्जासाठी Mahakumbh मध्ये दररोज ९ तास होणार महायज्ञ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परभणीतील घटनेवेळी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यूमुखी पडलेले विजय वाकोडे (Vijay Vakode) यांच्या कुटुंबियांबाबतही असाच निर्णय घेतला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत माहिती दिली आहे. “विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते. दुर्दैवाने त्यांचा जो अंत झाला आहे, परभणीत जे वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीत त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: सभागृहात सांगितलं होतं. अधिवेशन संपल्यानंतर मी स्वत: परभणीला गेलो होतो.”

हेही वाचा-१० जानेवारीला भाजपाचे घर चलो अभियान; प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांची माहिती

“परभणीला विजय बाबांच्या घरी गेल्यानंतर सर्व कुटुंबियांना विनंती केली होती की, आपण सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत यावं. मी मुख्यमंत्र्यांची (Devendra Fadnavis) वेळ घेतो. तिथले माजी आमदार सुरेश देशमुख, माजी महापौर सोनकांबळे, विजय वाकोडे यांचे थोरले आणि धाकटे चिरंजीव सर्वजण आले. विजय वाकोडे यांचा एक मुलगा शासनानात घेण्याबाबतचा निर्णय झाला. तसेच ज्या ठिकाणी आंदोलन झालं ते स्थळ स्मृतीस्थळ होईल. विजय बाबांच्या अंत्यंविधीच्या ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेला आहे तिथे स्मृतीस्थळ होईल. असे दोन्ही आश्वासन वाकोडे कुटुंबियांना दिले आहेत. जे फक्त अॅक्शन मोडमध्ये आंदोलक तरुण होते त्यांच्यावर कारवाई होईल. इतरांवर जे नोकरीस प्राप्त आहेत ते सर्व चार्जशीटमधून वगळण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.” असं सुरेश धस यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.