Devendra Fadnavis यांनी शिवरायांनी सुरत लुटली नसल्याच्या वक्तव्याचा केला खुलासा; म्हणाले…

अल्लाउद्दीन खिल्जी आणि अब्दाली यांनी लुट केली असे म्हणता येईल.

112

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली नाही, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यानंतर फडणवीस यांनी याचा शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी खुलासा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली हे मी कदापि मान्य करणार नाही. त्यांनी सुरतेवर स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी, तैमूरलंग यांनी जे केले त्याला लूट म्हणतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य लोकांना हातही लावला नाही, असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा Mangal Prabhat Lodha : जोधपूरमध्ये उच्च न्यायालयातील वकील ते सध्याचे देशातले सगळ्यात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक, कसा आहे मंगलप्रभात लोढांचा प्रवास)

लूट अल्लाउद्दीन खिल्जी आणि अब्दाली यांनी केली 

आपला बाप (छत्रपती शिवाजी महाराज) लुटारू होता हे मी मान्य करणार नाही. शरद पवार यांना महाराजांना लुटारु म्हणणे मान्य आहे का?, माझा राजा लुटारू नव्हता. माझ्यावर कितीही टीका केली तरी मी हे मान्य करणार नाही, असेही फडणवीस (Devendra Fadnavis)  यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. त्यांनी सुरतेवर दोनदा स्वारी केली. अल्लाउद्दीन खिल्जी आणि अब्दाली यांनी लुट केली असे म्हणता येईल. पण शिवरायांनी सुरतमध्ये एका तरी सामान्य माणसाला हात लावला का. महाराजांनी मोगल सुभेदाराला खलिता पाठविला. तुमच्या राज्यकर्त्यांच्या वागण्यानेच मला मोठे सैन्य बाळगण्यास भाग पाडले आहे. या सैन्याला पोसण्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे मोगलांनी आपल्या साऱ्याचा चौथा हिस्सा मला द्यावा. यासाठी नोटीस पाठवली आणि त्यानंतर ही रक्कम वसूल केली, अशी पावती देखील महाराजांनी दिली याला लुट म्हणतात का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला आहे. 1857 ची लढाई ही युद्ध नसून शिपायाचे बंड होते असे म्हणणे चुकीचे आहे, ती स्वातंत्र्यांची लढाई होती. आणि महाराजांना लुटारु म्हणणे चुकीचे आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.