‘सहकारी कारखाने खासगी लोकांच्या घशात घालणे बंद झाले पाहिजेत’

106

एकीकडे सहकार क्षेत्र अडचणीत असतांना शेतकऱ्र्यांनी उभारलेले सहकारी साखर कारखाने खासगी लोकांच्या घशात घालण्याचे उद्योग मंद झाले पाहिजेत, असे परखड प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व प्रवरा औद्योगिक, शेक्षणिक व सांस्कृतिक समुहाच्या वतीने नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे आयोजित सहकार परिषद व शेतकरी मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

सहकार हाच उध्दाराचा तारक

फडणवीस म्हणाले की, देशपातळीवर सहकार खाते सुरू होताच मोदी सरकार ने सहकाराला जगविण्याचे काम केले. एमएसपीच्या निर्णयाने साखर कारखाने तरले आहेत. तसेच शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देणे देखील कारखान्यांना शक्य झाले.त्यामुळे शेतकर्यांचा देखील फायदा झाला आहे. तसेच आता केंद्र सरकारने इथोनॉल बाबत स्वीकारलेल्या नितिमुळे कारखान्यांचे दिवस पालटणार आहेत. कारखान्यांच्या वित्तीय मजबुतीसाठी तेल कंपन्यांना इथोनॉल विकत घेण्याची सक्ती देखीलसकरण्यात आली आहे. सहकार हाच उध्दाराचा तारक आहे हे 75 वर्षानंतर देशाला समजले आहे. ज्या भूमीत प्रवरानगर मध्ये देशातील सहकाराची मूहूर्तमेढ रोवली गेली, ज्या ठिकाणी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्या ठिकाणी आयोजित सहकार परिषदेसाठी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह उपस्थित आहेत हा मोठा विलक्षण योगायोग आहे, असे गौरवौद्गार फडणवीस यांनी काढले.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी म्हणाले… UP+YOGI, बहुत है उपयोगी’)

या सहकार परिषदेकरिता केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शाह,केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई चे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.