अजित पवार (Ajit Pawar) यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढे आणले. नंतर वरिष्ठांना वाटले की, पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. हेच शिवसेनेतही झाले. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) वाटले, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) पुढे आणले पाहिजे. त्याच अनुषंगाने त्यांनी राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या. यासाठी त्यांनी आपली मूळ विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेला स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली”, अशी प्रखर टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘काँग्रेस न होती तो क्या होता’ या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य केले.
(हेही वाचा – Uday Samant : शिवसेनेची काँग्रेस करायला ठाकरे धडपडताहेत; उदय सामंत यांचे टिकास्त्र)
कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “भाजपाने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला, तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. जर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी जरूर यावे. स्वतःच्या ताकदीवर यावे. राजकारणाला स्वतःचा हक्क समजून येऊ नये. जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून जेव्हा फक्त आपल्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत केलं जातं, त्याला घराणेशाहीचं राजकारण म्हणतात. काँग्रेसमध्ये नेहरूंच्या घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिलं जातं. आज मल्लिकार्जुन खरगे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहीत आहे.”
आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष तयार झाले. या पक्षांनी काँग्रेसच्या राजकारणाची शैली स्वीकारली. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा पायंडा पाडला, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या वेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community