Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

महायुती शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार - देवेंद्र फडणवीस

147
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

नुकताच भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्या एका व्हिडीओवरून राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” असा फडणवीसांचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरून प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली. शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? अशा चर्चा रंगू लागल्या.

आता या सर्व पार्श्वभूमीवर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधून फडणवीसांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Israel Hamas War : युद्धविरामाच्या ठरावावर भारत तटस्थ; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मतदानाला पाठिंबा देण्यास भारताचा नकार)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांचा एकही दिवस कमी होणार नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका होतील. एखाद्या चित्रफितीवरून त्याचा विनाकारण वेगळा अर्थ लावणे चुकीचे आहे. एखाद्याला पुन्हा यायचे असेल तर तो चित्रफीत प्रसारित करून येतो का? असा सवाल करीत किती हा वेडेपणा आहे. डोके ठिकाणावर असले पाहिजे असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

तसेच पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, “आपल्याकडे १०५ आमदार असते तर सरकार बनविले असते, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांना उद्देशून लगावला होता. त्यावर आपल्यात आणि शरद पवार यांच्यात हाच फरक आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.