या सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केलंय!

137

महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केल्याचं म्हणत, देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आमच्याच योजना पुन्हा सुरु

कळसूत्री सरकारनं विकासाची पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यानं काय होणार नाही. या सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केलं आहे. महाराष्ट्राच्या सर्व घटकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम या सरकारने केले आहे. या बजेटमधून महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार नाही. वृत्तपत्रात चौकट येतील, चार बातम्या होऊ शकतील असा बजेट आहे. आमच्या काळात सुरु असलेल्या योजना या बजेटमध्ये पुन्हा सांगायच्या. आमच्या योजना बंद करणाऱ्या सरकारनं पुन्हा त्या योजना सुरु केल्या, असं म्हणत फडणवीसांनी सरकारला टोला लगावला.

तर काॅंग्रेस -शिवसेना यावर मोर्चा काढणार?

समृद्धी महामार्गला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा विरोध होता. आता अर्थसंकल्पातून मात्र याचा उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांना या बजेटनं काहीही दिलं नाही. आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देतो आहे असं सांगितलं जात आहे. पण,   कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळालं नाही. कोरोना काळात सर्वाधिक रुग्ण मृत्यूमुखी पडलेल्या राज्याने सरकार कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटून घेतं आहे. काही योजना सोडल्या, तर समाजातील कोणत्याही घटकांना दिलासा मिळालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी फुटकी कवडी देण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन मोर्चा काढणार का? असा सवालही फडणवीस यांनी केला.

( हेही वाचा :लांब पल्लयाच्या गाड्यांसाठी आता आचारसंहिता, वाचा! )

सामान्यांची निराशा

मराठवाडा ग्रीडला निधी देण्यात आलेला नाही, दुष्काळमुक्तीसाठी निधी देण्यात आला नाही. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बजेटमध्ये दिसत नाही. काही मतदारासंघाचं सरकार, काही लोकांचं सरकार. या  केंद्र सरकारच्या योजना घोषित करण्यात आलेल्या आहेत. या बजेटनं सामान्य माणसाची निराशा झाली असल्यांचही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.