‘महाविकास आघाडी बावचळली आहे’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमूठ सभेवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि ठाकरे गट जनतेपर्यंत आपली भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ (Vajramuth Sabha) सभा सोमवार १ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे संपन्न झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजप सरकारवर टीका केली. त्या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde : मविआच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)
काय म्हणाले फडणवीस?
महाविकास आघाडी ही सध्या बावचळली आहे. त्यांची वज्रमूठ सभा दुसरं काहीही नसून निराश लोकांचं अरण्यरुदन आहे. माविआ कडून सतत निवडणूक घेऊन दाखवा असं सांगण्यात येतं त्यावर बोलतांना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, निवडणुका या रोज रोज होत नाहीत, आम्ही नक्कीच योग्य वेळी निवडणूक घेऊ आणि तुम्हाला पाडून पण दाखवू. पत्रकारांनी वज्रमूठ सभेतील इतर नेत्यांच्या भाषणावर, विधानांवर विचारलं असता मी काही सगळ्यावर प्रतिक्रिया देणार नाही असं म्हणत फडणवीसांनी उत्तर देणे टाळले.
हेही पहा –
उद्धव ठाकरे यांच्यांवर टीका
फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी काही प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मशीद पडत असताना आम्ही त्या ठिकाणी होतो, तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते याचे त्यांनी उत्तर द्यावे. रिफायनरी करा म्हणून पहिले हेच पत्र देतात आणि त्यानंतर तेच विरोध करतात, यावरून तुम्ही किती दुटप्पी आहात हे जनतेसमोर आले आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
मोदी यांना लोकांचा पाठिंबा
नरेंद्र मोदींना जितक्या शिव्या देणार तितके लोक त्यांना पराभूत करतील असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला आहे. महाविकास आघाडी यांच्याकडून मोदी यांना शिवीगाळ करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. (Devendra Fadnavis)
Join Our WhatsApp Community