विशिष्ट समाजाच्या लांगूलचालनाची उबाठाची भूमिका; Devendra Fadnavis यांची उद्धव ठाकरेंवर टीका

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन.

56
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ देणार; CM Devendra Fadnavis यांचे आश्वासन
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ देणार; CM Devendra Fadnavis यांचे आश्वासन

उद्धव ठाकरेंच्या सेनेची विशिष्ट समाजाच्या लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी असल्याची प्रखर शब्दातील टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे फडणवीस यांच्या हस्ते दिल्ली मधील जुन्या महाराष्ट्र सदनात उदघाट्न झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत अनेक विषयांवर संवाद साधला. साहित्य संमेलन यशस्वी व्हावे, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वक्फ सुधारणा विधेयकावरील उबाठाच्या भूमिकाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मतांच्या लाचारीकरता अशा प्रकारे जर या बिलाचा विरोध ते करत असतील, तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहतेय. त्यांना दिसतंय कशा प्रकारे ते लांगूलचालन करत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेने वक्फ विधेयकावरून केलेल्या विरोधाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले. केवळ एकाच समाजाच्या पाठीशी उभे राहायचे ही काँग्रेसची परंपरा होती, तीच लांगुलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सेनेने अंगीकारली. हे पाहून मला अतिशय दुःख झालं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

(हेही वाचा – Sri Sri Radha Gopinath Temple : गोपीनाथ मंदिराचा रहस्यमयी इतिहास तुम्हाला माहित आहे का ?)

महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जी भूमिका घेतली आहे, तीच महाराष्ट्र शासनाची अधिकृत भूमिका आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन दिवसीय दिल्ली दौरावर आले आहेत.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणारे हे पहिले मराठी साहित्य संमेलन होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सुध्दा येणार आहेत. मुळात हे संमेलन एका व्यक्ती किंवा संस्थेचे नसून महाराष्ट्राचे आहे. यासाठी जे सहकार्य लागेल ते करण्यास सरकार कटिबध्द आहे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Washington DC Plane Crash : अमेरिकेत प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; बचावकार्य सुरु)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेले अन्य महत्त
  • दिल्लीतील लोकांच्या मनात परिवर्तन दिसत आहे. मागील 10 वर्षांत ज्या गोष्टी व्हायला पाहिजे, असे वाटत होते ते झाले नाही. दिल्लीकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर विश्वास दाखविला होता. आता विधानसभेतही विश्वास दाखवतील, याची मला खात्री आहे.
  • प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश आहे. त्यातील काही लोकांनी आपल्याशी संपर्क साधला. यानंतर मी लगेच उत्तरप्रदेश सरकारशी चर्चा केली आणि सरकारने तातडीचे पाउल उचलत अडकलेल्यांना बाहेर काढले.
  • लग्न समारंभात अनेक लोक भेटत असतात. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील, उध्दव ठाकरे यांना भेटले. मात्र, लग्नात भेट झाल्याने दोन पक्ष जवळ येतील किंवा त्यांची युती होईल, हा भाबडेपणाचा विचार आहे. असे होत नसते.
  • राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केंद्रातील अर्थमंत्र्यांची भेट घेवून महाराष्ट्राच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. त्यावर काम सुरू आहे.
  • महाराष्ट्र सदनातील अधिका—यांची बैठक घेवून आढावा घेवू आणि अव्यवस्था दूर करू. महाराष्ट्र सदनात एका दिवसासाठी सहा हजार रूपये भाडे मोजावे लागतात. पण या तुलनेत गैरसोयी खूप आहेत. गरम पाणी मिळत नाही, अशा तक्रारी आहेत.
  • अर्थसंकल्पापूर्वी राज्यातील खासदारांची होणारी बैठक अद्याप झालेली नाही. परंतु सरकार बैठक बोलाविणार आहे. मात्र, बैठकीचे स्वरूप बदलले. राज्याचे प्रलंबित प्रश्न संसदेत मांडणे हा बैठकीचा हेतू होता. आता खासदारच आपल्या समस्या सांगतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.