मुख्यमंत्र्यांनी माझ्याप्रमाणेच संभाजीराजेंचा फोन उचलला नाही- फडणवीस

88

संभाजी राजे छत्रपती यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर आता संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता शिवसेनेवर जोरदार टीका होत असतानाच, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजेंचा फोन उचलला नाही, आधी माझाही उचलला नव्हता, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

(हेही वाचाः पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी नाही, मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल)

संभाजी राजेंची कोंडी

संभाजी राजेंची शिवसेनेकडून कोंडी करण्यात आली. तिसरी जागा ही आपल्याकडे नसून ती शिवसेनेकडे असल्याचे शरद पवार यांना माहीत होते. पण तरीही आपण आपली मते संभाजी राजेंना देऊन त्यांना पाठिंबा देण्याचे चित्र निर्माण करण्यात आले. संभाजी राजे यांनी आपण ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. पण त्यानंतर त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगण्यात आले.

यात काही वेगळं नाही

त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजेंचा फोन उचलला नाही. याआधी माझाही फोन त्यांनी उचलला नव्हता. त्यामुळे हे काही नवीन घडलेलं नाही, दरवर्षी हे असंच वागतात. असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः नवनीत राणा प्रकरणः राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस महासंचालकांना दिल्लीत बोलावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.