Devendra Fadnavis : “देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और….” देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

71
Devendra Fadnavis :
Devendra Fadnavis : "देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और...." देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

“देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है”, असा डायलॉग मारत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांना इशारा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी फडणवीस (Devendra Fadnavis) दि. ७ ऑक्टोबर रोजी दौऱ्यावर होते. तिथेच त्यांनी डायलॉग मारत विरोधकांना इशारा दिला आहे. ज्यामुळे राजकीय घडामोडींना ही वेग आला आहे.

(हेही वाचा : Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट ; भाजपाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती तरीही उद्धव ठाकरे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मी समाधान आवताडे (Samadhan Autade) यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सांगितले होते की, १०६ आमदार निवडून द्या. सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. तुम्ही विश्वास दाखवून १०६ आमदार मला दिला. त्यानंतर महायुतीचं शिंदें (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तेत आलं. त्यानंतर दुसरा आश्वासन दिलं होत की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघात पाणी आणून दाखवेन आणि मागच्या काही काळात सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली. त्यामुळे ‘देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’, असा डायलॉग मारत त्यांनी विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.