उद्धव ठाकरे म्हणतात, फडणवीस फडतूस; फडणवीसांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

97

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्याची तथाकथित घटना घडली. त्याची तात्काळ दखल घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी टीका केली. त्यावर फडणवीसांनी तात्काळ माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत, त्या मंत्र्यांभोवती लाळ घोटत असतात अशा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचे तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.

(हेही वाचा “हे राऊत, फाऊद, दाऊद यांना…” पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी फडणवीसांचे राऊतांवर टीकास्त्र!)

…तर पळता भुई थोडी होईल 

ज्या दिवशी बोलणे सुरू करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावे. त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचे कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात. मग खरा फडतूस कोण? याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ते जितक्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे. मात्र, मी तसे  बोलणार नाही. कारण तसे बोलण्याची माझी पद्धत नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.