जुन्या पेन्शन योजनासंदर्भात गेल्या सात दिवसांपासून राज्यात शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. जो अखेर सोमवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना हा बेमुदत संप मागे घेतला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई करू – फडणवीस
प्रसार माध्यमांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला असे वाटते कर्मचाऱ्यांच्या जो काही प्रश्न होता, तो आम्ही अॅड्रेस केला. कुठेही गर्व न ठेवता, त्यांना जे सोशल संरक्षण हवे आहे, त्यांना निवृत्तीनंतर जे फायदे हवे आहेत, त्यासंदर्भातील जे तत्व आहे, ते तत्व आम्ही मान्य केले आहे. आता त्याची कार्यवाही कशी करायची, याचे काम समिती करत आहे. त्यामुळे सरकारने कुठेही आडमुठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी सरकारच्यावतीने सांगू इच्छितो की, शेवटी सर्व कर्मचारी आमचे आहेत, त्यामुळे त्यांना जे चांगल्यातले चांगले देता येईल, ते देण्याचा प्रयत्न करणे ही आमची जबाबदारी आहे. कुठेही त्यात आमची आडमुठी भूमिका नाहीये. त्यासंदर्भात आता ही जी समिती आहे, जे काही तीन-चार मुद्दे ठरले आहेत, त्या मुद्द्यावर अहवाल देईल. त्याच्या आधारावर पुढची कारवाई करण्यात येईल. शेवटी आम्ही जे सातत्याने म्हणत होतो की, संवादातून तोडगा निघतो, तो संवाद झालेला आहे. म्हणून मी कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन करतो. विशेषतः पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.’
(हेही वाचा – अनिल जयसिंघानींच्या अटकेवर आदित्य ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केले बोट)
Join Our WhatsApp Community