२००४ मध्ये राष्ट्रवादीची आमदार संख्या काँग्रेसपेक्षा जास्त होती, तेव्हा ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरले होते, मग तरीही अजित पवारांना शरद पवारांनी मुख्यमंत्री बनवले नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.
अजित पवारांच्या पत्नीचा उल्लेख
हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या मुद्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर टीकाटिप्पणी केली. राज्याच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. कुणी कितीही काही बोलले तरी भाजपामध्ये फडणवीसच ताकदवान आहेत. पण राज्याच्या मंत्रिमंडळासाठी एक महिला नेता मिळत नाही हे दुर्देव आहे. आता मी अमृता वहिनींनाच फोन करुन सांगणार आहे यांच्याकडे जरा बघा, असे अजित पवार विधानसभेत म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले, अजित दादांनी सांगितले की एकदा अमृताशी बोला, पण दादा हे बोलताना तुम्ही सुनित्रा ताईंना विचारले होते का?, असे फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community