मी पुण्यात नेहमी येत असल्याने पुण्याच्या जवळ येत असल्याचे बोलले जाते. मात्र, असे असले तरी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
यामुळे भाजपाच्या पुण्यातील इच्छुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांच्या इच्छा पल्लवीत झाल्या आहेत.
पुणे लोकसभा मतदार संघासाठी राजकीय पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा :
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. या वेळी भाजपाचे पुण्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे लोकसभा मतदार संघ हा राज्यातील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. तो ताब्यात ठेवून त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा असते.
(हेही वाचा – Indi alliance अधिकृतपणे फुटली; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून काँग्रेसला ‘दे धक्का’)
🔸विकसित भारत एम्बेसडर , विकसित पुणे कॉन्क्लेव्ह@narendramodi @VBAswithNAMO @HiteshJ1973 @PMOIndia #Maharashtra #Pune #ViksitBharat #ViksitPune pic.twitter.com/vnlp77dkfS
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2024
पुण्यातून फडणवीस निवडणूक लढविणार असल्याची चर्चा :
दरम्यान, भाजपामध्ये इच्छुक उमेदवारांचा भरणा अधिक आहे. दरम्यान, पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) Lok Sabha Electionनिवडणूक लढविणार असल्याची चर्चा पसरली होती. मात्र, मोदी हे वाराणसीतूनच लढणार आहेत. त्यानंतर फडणवीसांच्या उमेदवारीची चर्चा मात्र कायम होती. अखेर फडणवीस यांनी स्वत:च आपण पुण्यातून लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे भाजपच्या अन्य इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community