उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (२५ नोव्हेंबर) जहांगीर आर्ट गॅलरीला भेट दिली. फडणवीस म्हणाले, डॉ. रमाकांत पांडा हार्ट सर्जन आहेत, त्याप्रमाणेच ते सिद्ध हस्त फोटोग्राफर आहेत. मी जहांगीर आर्ट गॅलरीतील फोटो पाहून आश्चर्यचकित झालो. निसर्गाचं वैविध्य आणि प्राण्यांचे विविधांगाने छायाचित्रण केलं असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी कमळा सोबत वाघ असा एक फोटो होता. ते पाहून फडणवीस यांनी राजकीय टोले देखील लगावले आहेत. (Devendra Fadnavis)
यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील जहांगीर आर्ट गॅलरीत भेट दिली होती. यावेळी कमळा सोबत वाघ असा एक फोटो होता. या फोटोंवर त्यांनी मिश्किल टिप्पणी दिली होती. या फोटोवर उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणी बोलून दाखवल्या होत्या. “एकवेळ होती जेव्हा कमळ आणि वाघ सोबत होते”, असं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा : MHADA : जीआयएस यंत्रणेच्या मदतीने मिळणार म्हाडाच्या भूखंडाची माहिती)
काय म्हणले फडणवीस
तोच फोटो देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळ थांबून पाहिला. फोटो पाहिल्यावर फडणवीस म्हणाले की, “मी माझ्या नजरेतून पाहतो. ते ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात, त्या गोष्टी आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो.”उद्धवजी स्वतः फोटोग्राफर आहेत मी सामान्य माणूस आहे. ते त्यांच्या नजरेतून पाहतात, मी माझ्या नजरेने पाहतोय. तर ज्या गोष्टी ते कमेरातून टिपतात, तशाच प्रकारे काही गोष्टी आम्हालाही टिपता येतात त्या आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो, असे फडणवीस म्हणाले.
हेही पहा –