उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रविवारी नागपुरात होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. मी 3 महिन्यांत महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो. आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली. त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खचतात, निराश होतात. पण कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे वागणे सोडावे. आपली लढाई रयतेचा राज्य आणण्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही ताकदीने मैदानात उतरा, सहाही जागा आपल्या महायुतीच्या येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा –‘लाडक्या बहिणी’ला Love Jihad विरोधी कायद्याचे संरक्षण द्या!)
यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरमधील झालेल्या विकासकामांबद्दल माहितीही दिली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली. त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. नागपूर जिल्ह्यात विकासाची गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली. नळ गंगा योजना आम्ही आणली, त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल. मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आपण विदर्भात आणली. असं फडणवीस म्हणाले.
विधानसभेवर महायुतीचाच झेंडा फडकणार!🚩
जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत आज सावनेर, नागपूर येथे सहभागी झालो. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
महाराष्ट्रात आणि नागपुरात पॉलिटिकल अर्थमॅटीक आपल्या विरोधात गेले, यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे ‘फेक… pic.twitter.com/6ZPCJzrP6g
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 4, 2024
(हेही वाचा –Manu Bhaker : भगवद्गीता विरूद्ध आतंकवाद!)
आपले कार्यकर्ते काम चांगले करतात. मात्र, विरोधकांप्रमाणे आपण मार्केटिंग करत नाही,आता आपली कामं तुम्ही दाखवा. हे लोक एवढे हुशार आहे ते निवडणुकीपुरत्या घोषणा करतात, मार्केटिंग करतात. त्यामुळे आता तुम्हीदेखील आपलं मार्केटिंग करा, आपले काम जनतेला दाखवा. अनेक कार्यकर्ते थकले होते , चालते तर चालू द्या, अशा मनोवृत्तीने काम करत होते. अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहेत, ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा, असं फडणवीस यावेळी म्हणाले. (Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community