फडणवीस निघाले गुजरातला, मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला! फडणवीस होतायेत ट्रोल!

89

गुजरातची निवडणूक २०२२ ला होणार आहे, त्याआधीच भाजपाने आता सारवासारव सुरु केली आहे. गुजरात राज्यातील कोरोनाची स्थिती सांभाळण्यात मुख्यमंत्री विजय रुपानी अपयशी ठरले. त्यामुळे भाजपाने रुपानी यांचा राजीनामा घेतला, काँग्रेसच्या ‘कोविड न्याय यात्रा’ ने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण केल्याचे हे परिणाम असल्याची चर्चा नेटकऱ्यांनी सुरु केली आहे. तसेच या घटनेशी नेटकऱ्यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संबंध जोडला आहे. म्हणे फडणवीस आता गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी गुजरातकडे रवाना झाले आहेत, अशा प्रकारे फडणवीस सोशल मीडियात ट्रॉल होऊ लागले आहेत.

भाजपाची आगामी निवडणुकीची रणनीती!

दरम्यान ज्या ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन खांदेपालट करण्याची भाजपा नेतृत्वाची घाई सुरु झाली आहे. मात्र खांदेपालट करण्याची गरजच का भासली? असा प्रश्न नेटकरी विचारू लागेल आहे. जर योग्य नेतृत्व देता आले नाही, तर हा दोष भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा नाही का?, त्यांच्या विषयी कुणी ‘ब्र’ ही काढणार नाही का, असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे. उत्तराखंड येथे २ मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला, आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांचा राजीनामा, कर्नाटकातून बी. एस. येदीयुरप्पा यांचा राजीनामा, आता गुजरातमधून विजय रुपानी यांचा राजीनामा. कुणीच पक्षाच्या नेतृत्वाबद्दल ‘ब्र’ काढणार नाही, कुणीही बंड करणार नाही, भाजपाची हीच शिस्त आहे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

https://twitter.com/MrSinha_/status/1436631721995243521?s=20

फडणवीस होतायेत ट्रोल!

दरम्यान एकीकडे गुजरातमध्ये भाजपा अचानक खांदेपालट का करत आहे, यावर तर्कवितर्क सुरु असतानाच ट्विटरवर या प्रकरणी देवेंद्र फडणवीस ट्रोल होत आहेत. ब्रेकिंग न्यूज, देवेंद्र फडणवीस विमानाने गुजरातकडे रवाना, मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार.

ब्रेकिंग न्यूज – देवेंद्र फडणवीस गुजरातची जबाबदारी स्वीकारणार.

ब्रेकिंग न्यूज – गुजरात मुख्यमंत्री रुपानी यांचा राजीनामा. त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस गुजरातच्या दिशेने रवाना

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे, देवेंद्र फडणवीस कुणाचेही ऐकायला तयार नाही, ते आधीच गुजराकडे रवाना होण्यासाठी विमानात बसले आहेत. त्यांच्या दबावामुळे विजय रुपानी यांनी दिला राजीनामा.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.