देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

188

राज्यात सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, ते कडवट हिंदुत्ववादी विचारांचे आहेत, तर हिंदुह्रद्यसम्राट देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केले.

अपहरण, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणी नगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यात हजारो जण सहभागी झाले होते. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे यांनी फडणवीस यांचा उल्लेख हिंदुह्रद्यसम्राट असा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर देवेंद्र फडणवीसांना हिंदुह्रद्यसम्राट म्हणण्यात चुकीचे काय? जो जो हिंदूचे रक्षण करतो, हिंदूच्या हृदयात आहे त्यांना हिंदुहृदयसम्राट नाही म्हणायचे, तर काय म्हणायचे, असा प्रतिप्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो आणि मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळाली – देवेंद्र फडणवीस)

हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन 

लव्ह जिहाद प्रकरणी श्रीरामपूरमध्ये गेल्या काही काळात मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविरोधात आंदोलनात आता भाजपा आणि नितेश राणे हेही उतरलेले दिसत आहेत. धर्मांतरण आणि आदिवासी तरुणांच्या अपहरणाच्या  घटनाही वाढल्या आहेत. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. अपहरण प्रकरणात पोलीस अधिकारी माहिती द्यायला तयार नाही. त्यांना बहुतेक या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री हे आता नवाब मलिक राहिलेले नाहीत, तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ नाहीत, याचा विसर पडलेला दिसतो, असा टोलाही राणे यांनी पोलिसांना लगावला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यानेच या प्रकरणात कारवाई आणि चौकशी सुरु असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.