Devendra Fadnavis : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत.

169
Devendra Fadnavis : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रविवार २० ऑगस्ट रोजी पाच दिवसांसाठी जपानच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौऱ्यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे. राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत. फडणवीस यांचा जपान दौरा हा २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

(हेही वाचा – Mumbai-Goa Highway : सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?)

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दुसरा जपान दौरा

राज्यात २०१४ मध्ये त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आल्यावर सप्टेंबर २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जपानचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांनी ओसाका प्रांताला भेट दिली होती. जायकासोबत चर्चा केली होती. याकोहामा पोर्टला भेट दिली होती तसेच तेथील अनेक मंत्र्यांशी बैठका देखील झाल्या होत्या.

जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी चर्चेनंतर महाराष्ट्रातील (Devendra Fadnavis) अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर २०१७ मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.