CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?

267
CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?
CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?

प्रचंड बहुमताने निवडून येऊनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी वाट पहावी लागली. (oath ceremony maharashtra) नागपूर येथे प्रचारसभेत बोलतांना त्यांनी माझे मुंबईत अजून एकही घर नाही, असे सांगितले आहे. त्यांच्या नावावर त्यांची स्वतःची कारही नाही, असे त्यांच्या शपथपत्रात म्हटले आहे. जाणून घेऊया मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांची किती आहे संपत्ती ? फडणवीस यांनी निवडणुकीत शपथपत्र दाखल केले. त्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे १३ कोटींची संपत्ती आहे. (CM Devendra Fadnavis)

१३ कोटी रुपये आहे संपत्ती

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्मनुसार २०२३-२०२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये इतके आहे, तर २०२२-२०२३ मध्ये हा आकडा ९२ लाख ४८ हजार ०९४ रुपये इतके होते. फडणवीस यांनी पत्नी अमृता यांची संपत्ती ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपये, तर मुलगी दिवीजा हिची संपत्ती १० लाख २२ हजार ११३ रुपये आहे.

अमृता फडणवीस यांची किती आहे संपत्ती ?

मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी अमृता (Amrita Fadnavis) यांच्याकडे १० हजार रुपये रोख रक्कम आहे. फडणवीस यांच्या बँक खात्यात २ लाख २८ हजार ७६० रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे १ लाख ४३ हजार ७१७ रुपये आहेत. फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात २० लाख ७० हजार ६०७ रुपये गुंतवले आहेत. त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर, म्यूचल फंड आदी मध्ये मिळून ५ कोटी ६२ लाख ५९ हजार ०३१ रुपये गुंतवणूक केली आहे. फडणवीस यांच्या NSS-बचत खात्यात १७ लाख रुपये जमा आहेत, तर एलआयसीमध्ये ३ लाखांची गुंतवणूक आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याचे बाजारातील मूल्य ३२ लाख ८५ हजार इतके आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. फडणवीस यांच्याकडे ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.