विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघासाठी दि. २५ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला. त्यावेळी फडणवीसांनी शपथपत्रात नोंदवलेल्या माहितीनुसार त्यांच्या एकट्याच्या नावावर सद्या सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत २३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. (Devendra Fadnavis)
( हेही वाचा : नवी मुंबईतील विमानतळाच्या नजीक उभा राहिला मोठा बेकायदेशीर Dargah; कारवाईची मागणी)
२०१९ मध्ये फडणवीसांकडे ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची चल आणि ३ कोटी ७८ लाख २९ हजारांची अचल संपत्ती होती. एकूण संपत्ती ४ कोटी २४ लाखांच्या आसपास होती. मात्र पाच वर्षात त्यात वाढ होऊन १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यात ५६ लाख ७ हजार ८६७ रुपयांची चल, तर ४ कोची ६८ लाख ९६ हजारांची अचल संपत्ती आहे. (Devendra Fadnavis)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community