निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो तेव्हा असे प्रकार घडायला लागतात. विनोद तावडे आमचे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव असल्याने कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी विरारला गेले होते. त्याकडे कोणत्याही चुकीच्या गोष्टी सापडलेल्या नाहीत. मात्र भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) आणि नालासोपारा विधानसभेचे भाजपाचे उमेदवार राजन नाईक (Rajan Naik) यांच्यावर हल्ला करण्यात आला, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली आहे.
( हेही वाचा : Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या ४१२ उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद)
पुढे फडणवीस म्हणाले की, उद्याचा पराभव करण्यासाठी कव्हर फायरिंग केलेले आहे. विनोद तावडे यांनी कुठलेही पैसे नेले नाहीत. पैसे वाटपाचे कोणतेही काम विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केलेले नाही. त्यामुळे विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी याप्रकरणात दोषी नाहीत, पराभव दिसू लागल्याने आरोप सुरु आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी माहिती नागपूरात पत्रकारांना दिली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community