महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा सुरु झाली. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी राज्यभरातून भाजप कार्यकर्त्यांकडून केली जातेय.
दरम्यान भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे मागणी केली आहे. छ.संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना रक्ताने पत्र लिहले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मनिषा मुंडे यांनी रक्तने पत्रात लिहलेय की, महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात विधानसभेत घवघवीत यश मिळवले. त्यांच्यावर मागील पाच वर्षात विरोधकांनी जातीवाचक शेरेबाजी, पत्नीवरून अश्लाघ्य शेरेबाजी, आईवरून शिवीगाळ, शारिरीक टिपण्ण्या, मराठा आरक्षण आंदोलनात खलनायकाचा शिक्का मारण्यात आला. इतक सगळं सहन करूनही न डगमगता, न थांबता अहोरात्र फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करणारा, आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा देवाभाऊ यांनाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना प्रत्येक लाडक्या बहिणींची विनंती आहे, असे ही त्यांनी पत्रात नमुद केले आहे. त्यात दुसरीकडे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाण्यातील कोपरी परिसरातील दौलत नगर येथील सिद्धिविनायक मंदिरात मुख्यमंत्री शिंदे व्हावेत, यासाठी महाआरती करत देवाकडे साकडं घातलं.
हेही पाहा :