केंद्राचा पुरेपुर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करा; अधिकाऱ्यांना सूचना देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis अॅक्शन मोडवर

52
केंद्राचा पुरेपुर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करा; अधिकाऱ्यांना सूचना देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis अॅक्शन मोडवर
केंद्राचा पुरेपुर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करा; अधिकाऱ्यांना सूचना देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis अॅक्शन मोडवर

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) अॅक्शन मोडवर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव आणि सचिव यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांना पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकपणा यावर भर देण्यास फडणवीसांनी सांगितले. यासोबतच केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या, अधिक समन्वय आणि पाठपुराव्याची व्यवस्था करण्याचे देखील फडणवीसांनी (Devendra Fadnavis) निर्देश दिले.

( हेही वाचा : प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा; Hindu Janjagruti Samiti ची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या, अधिक समन्वय आणि पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा. जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यंत लाभ गतीने पोहोचले पाहिजे, असे ही फडणवीसांनी (Devendra Fadnavis)सांगितले.

तसेच महाराष्ट्र (Maharashtra) हे असीमित ताकदीचे राज्य आहे, आपण नंबर १ वर आहोत म्हणून थांबू नका. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे. तंत्रज्ञानाचा महत्तम वापर करा. १०० दिवसांचे कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करावा, अशा सूचना ही फडणवीसांनी (Devendra Fadnavis)अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.