बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नसून गुंडांचे राज्य चालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पत्रकारांना दिली. दि. ३१ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने सीआयडीपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही, हे मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे. त्यामुळे या प्रकरणात ज्याचा ज्याचा संबंध आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही, हे मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे. ज्याचा ज्याचा संबंध ज्या ज्या प्रकरणात आढळला त्या प्रत्येकावर कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही गुंडांचं राज्य चालू देणार नाही. तसेच यापुढे कोणालाही अशा प्रकराची खंडणी मागत हिंसा करता येणार नाही. यादृष्टीने कठोर पावले उचलून तपास सुरु केला आहे. त्यामुळेच वाल्मिक कराडने (Walmik Karad) शरणागती पत्करली आहे. हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळे पथकांना सक्रीय करण्यात आले आहे. आम्ही सर्व आरोपींना शोधून काढू आणि आरोपींवर अतिशय कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
संतोष देशमुखांच्या बंधुंसोबत फोनवर चर्चा!
स्वर्गीय संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या बंधूंची आणि माझी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांना आम्ही आश्वसत केले आहे की, आरोपी फासावर लटकत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. वाट्टेल ते झाले तरी सगळे दोषी शोधून त्यांच्यावर कारवाई करू, हा विश्वास मी त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) सांगितले.
पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, वाल्मिक कराडवर कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळे पोलिस सांगतील. हे पोलिसांचे काम आहे. मात्र पुराव्यांच्या आधारे कुणालाही सोडणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. तसेच यासंदर्भात वेळोवेळी पोलिस निर्णय घेतील. त्यामुळेच जाणीवपूर्वक हे प्रकरण सीआयडीला देण्यात आला असून त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांच्यावर कुणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही. कुणीही काहीही म्हणत असले तरी पोलिस पुराव्याच्या आधारेच कारवाई करतील. त्यामुळे व्हिडीओमध्ये कोण काय म्हणतो हा विषय नाही. मात्र जिथे पुरावा आहे त्या आरोपीला सोडले जाणार नाही.”
विरोधकांना राजकारण लखलाभ!
माझ्यासाठी या प्रकरणाचे राजकारण महत्त्वाचे नाही. कुणाच्याही विरुद्ध पुरावा असल्यास तो द्यावा. आम्ही ही शोध घेत आहोत. पण माझ्याकरीता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे महत्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने फार फायदा होईल असे मला वाटत नाही. त्यामुळे मला कुठलेही राजकीय वक्तव्य करायचे नाही. तसेच राजकारण करणाऱ्यांच्या वक्तव्याचे समर्थनही करायचे नाही आणि विरोधही करायचा नाही. त्यांनी त्यांचे राजकारण करत राहावे. मात्र, संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community