राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केली आहे. ही अज्ञात महिला पास न काढता मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला आणि फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ही महिला इथून निघून गेली. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा-Devendra Fadnavis: “धर्मवीर ३ ची पटकथा मी लिहिणार”, फडणवीसांच्या विधानाने चर्चांणा उधाण)
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्याठिकाणी तोडफोड केली. (Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community