२६/११ हा असा घाव, जो कधीच भरून निघणार – देवेंद्र फडणवीस

121

२६/११ हा मुंबईवर पडलेला असा घाव आहे, जो कधीच भरून निघणार नाही. त्यामुळे यापुढे असा घाव परत होऊ नये, यासाठी आम्ही दिवसरात्र काम करीत आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचा प्रवास होणार सुकर; लवकरच बीआरटी मार्ग विकसित करणार )

पांचजन्यतर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी, २५ नोव्हेंबर रोजी फोर्ट येथील हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुसऱ्या सत्राला संबोधित करताना फडणवीस म्हणाले, आजची मुंबई भयमुक्त आहे. मागच्या ८ वर्षांत मुंबईत भाईगिरी, वसुली, दहशतवादी कारवाया असे प्रकार कुठेही घडताना दिसत नाहीत. कारण आम्ही सुरक्षात्मक उपाययोजनांवर अधिकाधिक भर दिला आहे. त्यामुळे देशाच्या इतर शहरांच्या तुलनेत, मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे.

२६/११ नंतर सुरक्षात्मक खबरदारी म्हणून मुंबईत सीसीटीव्ही लावाव्यात असा शासनाचा अहवाल होता. पण तत्कालीन सरकारने तो गुंडाळून ठेवला. मुंबईत सीसीटीव्ही लागण्यासाठी २०१४ साल उजाडावे लागले. आम्ही सत्तेची सूत्रे हातात घेतल्यानंतर एका वर्षात पहिल्या टप्प्यातील कॅमेरे बसवले. मधली दोन वर्षे हे काम थांबले. पण आता पुन्हा नव्याने दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी आंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवली, हे याच आर्टिफिशिअल इंटिलीजन्समुळे कळले, असेही फडणवीस म्हणाले.

जशासतसे उत्तर देऊ

देशावर दहशतवादी हल्ला झाला, की त्याची कडक शब्दांत निंदा करायची, त्यापलीकडे काहीही नेही, अशी याधीच्या सत्ताधाऱ्यांची नीती होती. मात्र आता चित्र बदलले आहे. आता हल्ला केला, तर संपूर्ण ताकदीने उत्तर मिळेल, याची खात्री शत्रूराष्ट्रांना पटली आहे. याधीची सरकारे महासत्तांच्या दबावाला शरण जायची. पण आता चित्र बदलले आहे. आता शेजारील राष्ट्रांनाही कळून चुकले आहे, की यांच्याशी शत्रुत्व घेऊन चालणार नाही. त्यामुळे आजचा भारत पूर्ण वेगळा आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.