Devendra Fadnavis : ‘गाडीखाली श्वान आला तरी …’; घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

विरोधी पक्षांच्या आरोपांप्रमाणे या घटनेचा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेशी काहीही संबंध नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. "विरोधक यावर राजकारण करत आहेत, पण ते त्यांचे कामच आहे", असे फडणवीस म्हणाले.

570
Devendra Fadnavis : भाजपाची नाही, ही भारतासाठीची महत्वाची निवडणूक

सामाजिक कार्यकर्ते मॉरीस नोरोन्हा यांनी फेसबुक लाईव्हदरम्यान ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांना हत्येमागील काही कारणे सापडली आहेत आणि ती लवकरच जाहीर केली जातील.

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : मॉरिसच्या पीएसह एका व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

तरुण नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. वैयक्तिक वैमनस्यातून हे घडले आहे. अभिषेक आणि मॉरिस हे अनेक प्रसंगी एकत्र दिसले होते. २०२४ मध्ये देखील त्यांची भित्तीचित्रे एकत्र लावण्यात आली होती. हे काही मतभेदांमुळे घडले असावे. पोलिसांना काही कारणे सापडली आहेत आणि ती लवकरच जाहीर केली जातील, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांना सांगितले.

(हेही वाचा – Namo – The Grand Central Park : “द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क” ओळखले जाणार “नमो- द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क” नावाने – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

गाडीखाली कुत्रं आलं तरी …

संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना लगावला आहे.

या घटनेचा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेशी काहीही संबंध नाही –

विरोधी पक्षांच्या आरोपांप्रमाणे या घटनेचा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेशी काहीही संबंध नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “विरोधक यावर राजकारण करत आहेत, पण ते त्यांचे कामच आहे”, असे ते (Devendra Fadnavis) म्हणाले.

(हेही वाचा – Uday Samant : ‘सामना’तून मॉरिसला मोठं केलं गेलं)

बोरिवलीच्या (पश्चिम) उत्तरेकडील उपनगरातील आय. सी. कॉलनीतील मॉरिस यांच्या कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्या ओटीपोटाला आणि खांद्याला गोळी लागलेली दिसत आहे. त्यानंतर थोड्याच काळात मॉरीस यांनीही आत्महत्या केली. हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.