समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांना औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधाननंतर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच विधानसभा आणि विधानपरिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आक्रमक भूमिका घेत विरोधकांना निवडक टीका करु नका, असे सुनावले. तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचा (Jawaharlal Nehru) उल्लेख करत निशाणा साधला.
( हेही वाचा : Champions Trophy, Ind vs NZ Final : चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीसाठी दुबईत १ लाख लोकांची तिकिटासाठी झुंबड)
विधान परिषदेत, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना विचारले की, आझमी (Abu Azmi) यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल तुरुंगात का टाकण्यात आले नाही. तेव्हा फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मुंबईतील मानखुर्द-शिवाजी नगर येथील आमदाराला १०० टक्के तुरुंगात टाकले जाईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. तसेच त्यांनी दानवेंना सुनावत सांगितले की, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) काय बोलले होते, तेव्हा तुम्ही निषेध केला नाही. औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, औरंगजेब (Aurangzeb) किती बलाढ्य होता. महाराज पाच फुटाचे होते, असे विधान आव्हाडांनी रेकॉर्डवर केले होते. तेव्हा तुम्ही निषेध केला नाही, असा निवडक निषेध करू नका, असे ही फडवणवीसांनी (Devendra Fadnavis) सुनावले.
हेही पाहा :