Rahul Gandhi यांच्या खोट्या नरेटिव्हला काँग्रेसी नेतेही पुढे नेतात; देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस नेत्यावर टीका

कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांनंतर राजकीय वर्तुळातून निषेधाचा सूर

54
Rahul Gandhi यांच्या खोट्या नरेटिव्हला काँग्रेसी नेतेही पुढे नेतात; देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस नेत्यावर टीका
Rahul Gandhi यांच्या खोट्या नरेटिव्हला काँग्रेसी नेतेही पुढे नेतात; देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस नेत्यावर टीका

‘वीर सावरकर चित्पावन ब्राम्हण होते तरीही गोमांस खायचे’ असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री असलेल्या दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao) यांनी केले आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात गुंडूराव यांच्या विधानाचा निषेध केला जात आहे.

( हेही वाचा : Kho Kho News : राष्ट्रीय सब-ज्युनिअर खोखो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट )  

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantrya Veer Savarkar) अपमान केला जातो. त्यांना सावरकरांबद्दल काहीही माहिती नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गाईवर त्यांचे विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. सावरकरांनी सांगितलेल्याप्रमाणे शेतकऱ्याला जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत गाय मदत करत असते. त्यामुळे सावरकर गाईला उपयुक्त पशू म्हणाले होते. तसेच आम्ही सुद्धा गाईला मातेचा दर्जा देतो. मात्र काँग्रेसी नेतेमंडळी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नरेटिव्हला पुढे घेऊन जाण्यातच धन्यता मानत आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली.

कर्नाटक सरकारमधील मंत्री असलेल्या दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao) यांनी गांधीच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सावरकरांबद्दल हे वादग्रस्त विधान केले. जिना निषिद्ध असलेल्या डुकराचं मांस चवीने खायचे, तरीही ते मुस्लिमांचे हिरो ठरले, असे विधानही गुंडूराव (Dinesh Gundurao) यांनी केले. देशभरात गुंडूराव (Dinesh Gundurao) यांनी केलेल्या विधानाचा जाहिरपणे निषेध केला जात आहे. राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.