Devendra Fadnavis: “धर्मवीर ३ ची पटकथा मी लिहिणार”, फडणवीसांच्या विधानाने चर्चांणा उधाण

59
Devendra Fadnavis:
Devendra Fadnavis: "धर्मवीर ३ ची पटकथा मी लिहिणार", फडणवीसांच्या विधानाने चर्चांणा उधाण

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर आता ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

(हेही वाचा-Devendra Fadnavis: “… तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत!” फडणवीसांची स्पष्टोक्ती)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “आज धर्मवीर २ च स्क्रीनिंग सुरू झालं आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर १ हा चित्रपट आपण पाहिला. त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं. हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून एक संघर्षगाथा सामान्य माणसापर्यंत जात आहे. यातूनच लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. मलाही चित्रपटाबाबत उत्कंठा आहे. काही गोष्टी मी पाहिल्या आहेत, काही पाहायच्या आहेत.”

(हेही वाचा-हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती- DCM Devendra Fadnavis)

“महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला. त्यानंतर साहजिकच सगळ्यांची मागणी होती की ‘धर्मवीर २’ आला पाहिजे. ‘धर्मवीर १’ लोकांनी डोक्यावर घेतला. लोकांना तो अतिशय आवडला. एखाद्या चित्रपटातले चरित्रनायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिलंय, ज्यांच्याबद्दल वाचलंय, ऐकलंय असे चरित्रनायक जेव्हा पडद्यावर पाहायला मिळतात, तेव्हा लोक आपापल्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले जातात.” (Devendra Fadnavis)

चित्रपटाच्या पुढील भागात आपली काही प्रमुख भूमिका असेल का? किंवा असा कुठला चित्रपट आपण तयार करण्याचा विचार करत आहात का? अशी विचारणा केली असता त्यावर फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली. “जेव्हा धर्मवीर ३ येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन”, असं फडणवीस म्हणाले. मात्र, आता चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये दिवंगत आनंद दिघे यांचं आयुष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर ‘धर्मवीर ३’ मध्ये कुठल्या गोष्टी दाखवल्या जाणार आणि त्यासंदर्भात फडणवीसांना कुणाच्या आयुष्यावर बेतलेली पटकथा लिहायची असावी? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.