“हम साथ साथ हैं म्हणणारे आता हम तुम्हारे हैं कौन?” म्हणतायत; Devendra Fadnavis यांचं टीकास्त्र

89
"हम साथ साथ हैं म्हणणारे आता हम तुम्हारे हैं कौन?" म्हणतायत; Devendra Fadnavis यांचं टीकास्त्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मविआवर हल्लाबोल केला. “भाजप हरियाणामध्ये हरेल आणि त्यांच्यावर आम्ही हल्ला करू, अशा तयारीत शरद पवार (Sharad Pawar) उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस (Congress) होते. पण देशाचा मूड आता त्यांच्याही लक्षात आलेला असेल. त्यामुळे कधीकाळी “हम साथ साथ हैं म्हणणारे आता हम तुम्हारे हैं कौन?” असे म्हणायला लागले असल्याचे तुम्हाला पाहायला मिळत आहे. फेक नरेटीव संपलेला आहे, हे हरियाणाच्या निवडणुकीतून दिसून आलंय. आता लोक आता भाजपच्या पाठीशी आहे.” असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

(हेही वाचा-Sanjay Raut: हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे; राऊतांचा सामनातून टोला)

पंतप्रधानांच्या हस्ते आठ नवीन मेडिकल कॉलेजचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, “वित्तमंत्री असताना आठ नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच हे विदर्भातील आहे. यात पाच कॉलेजची सुरुवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यात गडचिरोली, भंडारा, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या मेडिकल सीटमध्ये मोठी वाढ होईल आणि त्याचा फायदा इथल्या स्थानिकांना होईल. मुख्यमंत्री असताना नागपूर विमानतळाचे टेंडर दिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. जवळ जवळ साडेचार वर्ष कोर्टातील प्रक्रियेनंतर आता त्याला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर आज या विकास कामाचे भूमिपूजन होत आहे.” अशी माहिती फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

(हेही वाचा-Election Commission: काँग्रेसचे ‘ते’ आरोप तथ्यहिन, बेजबाबदार! निवडणूक आयोगाने फटकारलं)

जागावाटपावर बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटल आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल होईल. अशी माहिती ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची सुरुवात करू, अशी घोषणा केली होती. मात्र, अडीच वर्षात एकही हॉस्टेल तयार झाले नाही. आमच्या सरकारच्या प्रयत्नाने अडीच वर्षात 52 होस्टेल आज सुरू होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी हक्काचे स्थान मिळत आहे. ज्या ठिकाणी होस्टेल नाही तिथे विद्यार्थ्यांना भत्ता सुद्धा देणार आहोत.”

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.