सरकार कायद्याच्या आधारेच स्थापन केले, काळजी नको – देवेंद्र फडणवीस

181

काहीही काळजी करू नका. आपण जे केले ते नियमाने केले, कायद्याने केले. कायद्याचा अभ्यास करून केले. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजुने निकाल लागेल. कारण आपण संविधानासंमत राहून काम केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला, तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आहे. पण न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला, तर न्यायालय दबावाखाली आहे. निवडणूक आयोगाबद्दलही त्यांनी असेच म्हटले आहे. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्नचिन्ह उमटवण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे, असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नाशिक येथे नुकतीच भाजपच्या प्रदेश पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या कार्यक्रमात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झाले आहे, ते सरकार खुद्दारांचे आहे. ज्यांची खुद्दारी जनतेसाठी, विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे, अशा खुद्दारांचे हे सरकार आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेले सरकार गद्दारांचे होते. पण ते (महाविकास आघाडी) रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असे म्हणतात. कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले १०-१५ आमदारही निघून जातील. म्हणून त्यांना दररोज सांगितले जाते की, हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार अपात्र ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत. हा संदेश आपल्यासाठी नाही. जे उरले-सुरले आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश आहे, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा टोला; म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.