Devendra Fadnavis: “ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”, फडणवीसांनी दिलं चोख प्रत्त्युत्तर

197
Devendra Fadnavis:
Devendra Fadnavis: "ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे", फडणवीसांनी दिलं चोख प्रत्त्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा व्हावी (Devendra Fadnavis) अशी सोलापूरकरांची मागणी होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत आहेत. सगळ्या परिसरात उत्साह आहे. असं फडणवीस म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विरोधकांच्या टीकेबाबत विचारण्यात आले. यावेळी फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis)

तुम्ही केलेले विकासाचे एक काम दाखवा

मोदींना मत म्हणजे विकासाला नाही, तर विनाशाला मत, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. यावर पलटवार करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्याचे कारण नाही. कारण पंतप्रधान मोदींनी केलेला विकास संपूर्ण देश पाहात आहे. उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, तुम्ही केलेले विकासाचे एक काम दाखवा. तुम्ही जीवनात कधी विकास केला नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना विकासकामे केली नाहीत. त्यांनी मोदींबाबत बोलणे म्हणजे सूर्याकडे तोंड करुन थुंकण्यासारखे आहे.” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis)

ठाकरे यांनी या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे आहेत. नरेंद्र मोदी खोट बोलत आहेत, त्यांचे हे खोटे बोलणे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होणार आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर, संजय राऊत कोण आहेत, हे मला माहिती नाही. पण एवढेच सांगतो की, ठाकरे यांनी या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे की, ते म्हणजे महाराष्ट्र आहे. असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Devendra Fadnavis)

राम रामचे नारे आम्ही देणारच

आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरे गटाला का आहे? भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का? असा सवाल करत, आम्ही राम राम करणारच. राम रामचे नारे आम्ही देणारच. असे ठाम मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.