Devendra Fadnavis : संयमानं परीक्षा घेतली; पण तो मेरिटमध्ये आला; आईने दिली कौतुकाची थाप

132
Devendra Fadnavis : संयमानं परीक्षा घेतली; पण तो मेरिटमध्ये आला; आईने दिली कौतुकाची थाप
Devendra Fadnavis : संयमानं परीक्षा घेतली; पण तो मेरिटमध्ये आला; आईने दिली कौतुकाची थाप

कोणत्याही क्षेत्रात बिनडाग राहिले पाहिजे. आपल्या चारित्र्यावर कोणी शंका घेता कामा नये, हा संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या वडिलांकडून देवेंद्रला मिळाला आहे. तो नम्र आहे, संयमी तर आहेच, अनेकदा संयमानं त्याची परीक्षा घेतली; पण दरवेळी तो मेरिटमध्ये आला, अशा शब्दांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आई सरिता फडणवीस (Sarita Fadnavis) यांनी लेकाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

(हेही वाचा – Devendra Fadnavis मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार! आझाद मैदानावर महायुतीच्या शपथविधीला ‘या’ दिग्गजांची उपस्थिती)

सरिता फडणवीस लेकाच्या कौतूकाने भावूक

२३ नोव्हेंबर राज्यातील निवडणुकीचा निकाल लागला. (maharashtra assembly election 2024) त्यानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्री कोण होणार, यावर बरीच खलबते झाली. अखेर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या आईने लेकाच्या संयमाचे कौतुक केले आहे. (devendra fadnavis oath ceremony)

5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची (cm of maharashtra) शपथ घेतील. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांची घोषणा होताच कार्यकर्त्यांसह नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. पाच वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस लेकाच्या कौतूकाने भावनिक झाल्या होत्या. या वेळी त्यांनी देवेंद्र यांच्या स्वभावाच्या काही अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकला.

सरिता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र शांत, दयाळू, होतकरू आणि शूर आहे. कपटी तर तो नाहीच. त्याच्यावर जेव्हा अशा टीका काही नेतेमंडळी करत असतात, तेव्हा मी व्यथित होते; कारण माझा देवेंद्र कसा आहे, हे मला चांगलंच ठाऊक आहे. खोटे बोलणे, कृत्रिम वागणे त्याच्या स्वभावात कधीही नव्हते. राजकारणात कितीही बाका प्रसंग आला, तरी संयमाने सामोरा जातो. बाहेर कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्याचा परिणाम घरात तो कधीही होऊ देत नाही.

घर आणि राजकारण देवेंद्रने (Devendra Fadnavis) पहिल्यापासून वेगळे ठेवलं आहे. नातेवाईकांवर आलेल्या चांगल्या-वाईट प्रसंगातही तो जातोच. पण कधी त्या शहरात गेल्यावर नातेवाईकांच्या घरी नक्की जातो. कुटुंबात चुलत-सख्खे असे काही पहात नाही. सगळ्यांशी जिव्हाळ्याने आणि आपुलकीने वागतो, अशी भावना सरिता फडणवीस (Sarita Fadnavis) यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.