Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री… कशी आहे देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द

88
Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक; न्यायालयीन स्थगिती उठवण्याच्या सरकारकडून हालचाली सुरु

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात दणदणीत विजय मिळवला आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. भाजपने गटनेतेपदी त्यांची निवड केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असल्याचं निश्चित झालं आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आजवरची राजकीय कारकीर्द त्यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरली आहे.

(हेही वाचा – तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे Devendra Fadnavis यांची कशी आहे शैक्षणिक कारकीर्द ?)

नगरसेवक ते मुख्यमंत्री
  • देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भाजपशी (BJP) संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते या संघटनेचे सक्रीय सदस्य होते.
  • पहिल्यांदा नागपूर (Nagpur) महापालिका निवडणूक राम नगर प्रभागातून जिंकली. १९९७ मध्ये फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर होते.
  • १९९९ मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभेमधून पहिल्यांदा निवडून आले. या मतदारसंघातून सलग दोनदा आमदार झाले.
  • दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चारदा विजयी झाले.
  • १९९९ पासून ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत.
  • २०१४ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ते ठरले.
  • २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पण काहीच दिवस टिकले.
  • ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या वेळी प्राप्त परिस्थितीनुसार देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले.
  • ५ डिसेंबर रोजी ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.