लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ४८ जागांसाठी १८ महिन्यांचे मिशन

170
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासून तयारी करू लागली आहे. यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकीला १८ महिने उरले असतानाच आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी हे मिशन आहे. याकरता भाजपने सर्व जागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्व लोकसभा निवडणुकीत दौरे काढणार 

यासंबंधी भाजपची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हेही उपस्थित होते. लोकसभेच्या सर्व जागांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ज्या समित्या स्थापन केल्या आहेत त्यांचे समन्वय आमदार चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत. या मतदार संघात नेते दौरे करतील, त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१७ सालीही असेच मिशन हाती घेतले होते, तसेच मिशन यावेळी हाती घेण्यात आले आहे. केवळ निवडणुकीत नाही तर इतरही वेळेत आम्ही काम करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

१६ जागांवर लक्ष्य केंद्रीय करणार 

मागील निवडणुकीत आम्ही ज्या जागा जिंकलो त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोतच, याशिवाय इतर १६ जागा आणि विशेष म्हणजे त्यातील ९ मतदारसंघातही विशेष लक्ष ठेवणार आहोत. या निवडणुकीत ४८ मतदार संघ जिंकू असा आमचा दावा नाही, पण आम्ही त्यावर काम करणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे आंदोलन चुकीचे आहे, राहुल गांधी यांची चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु आहे. नॅशनल हेराल्ड व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. सगळी संपत्ती गांधी परिवाराकडे गेली आहे, अशी फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.