मी कुठे काम करावे हे माझा पक्ष ठरवतो, पक्षाला वाटले दिल्लीत आवश्यकता आहे, तर मला दिल्लीत बोलवतील, महाराष्ट्रात गरज वाटत असेल तर महाराष्ट्रात ठेवतील, कुठेच गरज नसेल तर नागपूरला परत पाठवतील, परंतु माझ्या आजवरच्या राजकीय अनुभवानुसार मला महाराष्ट्रातच काम करायला संधी दिली जाईल, असा खुलासा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ते महाराष्ट्र सोडून दिल्लीला जाणार का, या चर्चेला पडदा टाकला.
….तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता
सध्या भाजपचे केंद्रीय नेतृत्व हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे, त्यासाठी काही राज्यांमध्ये उमेदवारी यादीही जाहीर केली आहे. अशा वेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिल्लीत बोलावले जाईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. यासंबंधी माध्यमांनी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. पक्षच माझ्याबद्दल निर्णय घेतो. मी स्वत: निर्णय घेत नाही. त्यामुळे माझ्या उत्सुकतेचा विषयच येत नाही. राजकीय वास्तविकतेला धरून अंतिम निर्णय घेतले जातात. राजकीय वास्तविकता हीच आहे की, माझ्या पक्षाने महाराष्ट्रात माझं नेतृत्व तयार केलं आहे. त्यामुळे मी आज महाराष्ट्राचा नेता आहे. ज्यादिवशी पक्षाला वाटेल दुसरा नेता तयार करायचा आहे, तेव्हा दुसरा नेता तयार केला जाईल. जोपर्यंत दुसरा नेता तयार केला जात नाही. तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता असेल. तसेच मी जेवढं राजकारण समजतो, त्यावरून मला वाटत नाही की मला दिल्लीत बोलावलं जाईल. त्यामुळे मी महाराष्ट्रातच काम करेन. महाराष्ट्रातलंच काम मला दिलं जाईल. महाराष्ट्रात मी पुन्हा आमचं सरकार निवडून आणेल, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा ‘तू भी है राणा का वंशज, फेंक जहां तक भाला जाए’ Asian Games 2023 मध्येही नीरज चोप्राला सुवर्ण )
Join Our WhatsApp Community