राज ठाकरेंनी अंधेरी निवडणूक लढू नका सांगितल्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

162

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित भाजपने ही निवडणूक लढवू नये अशी विनंती केली. आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे म्हटले आहे.

( हेही वाचा : World Green City : देशातली ‘या’ शहराला मिळाला वर्ल्ड ग्रीन सिटीचा बहुमान )

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असे त्यांनी आशिष शेलार यांना सांगितले. त्यांनी भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती आशिष शेलारांकडे केली त्यानंतर मला पत्र देत विनंती केली आहे. असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. परंतु भाजपचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. पक्षश्रेष्ठी, सहकाऱ्यांशी याबाबत चर्चा करावी लागेल असेही फडणवीसांनी सांगितले.

तसेच आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना असल्याने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी सुद्धा चर्चा करावी लागेल. आम्ही या पत्राचा गांभीर्याने विचार करू असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

राज ठाकरेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यासंदर्भात आता राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित विनंती केली आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होणं यामुळे कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीसांना केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.