पंढरपूरच्या विजयावर काय आहे फडणवीसांचे मत?

सत्ताधार्‍यांनी साम-दाम-दंड-भेद, शक्ती आणि पैशाचा प्रचंड दुरुपयोग केला. पण, जनतेने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला.

89

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला जनतेने दाखविलेला आरसा आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे.

सराकरवरील नाराजीचा परिणाम

समाधान आवताडे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंढरपूरच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. हा विजय आम्ही विठुरायाला समर्पित करतो. या मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला आरसा दाखविण्याचे काम केले आहे. सत्ताधार्‍यांनी साम-दाम-दंड-भेद, शक्ती आणि पैशाचा प्रचंड दुरुपयोग केला. पण, जनतेने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला. कोरोनाच्या काळात या सरकारने कुणालाच मदत केली नाही. बारा-बलुतेदारांमध्ये त्यामुळे प्रचंड नाराजी आहे. वीज तोडणीने तर जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. या सर्व नाराजीचा एकत्रित परिणाम झाला,असेही देवेंद्र ऱडणवीस म्हणाले.

(हेही वाचाः पंढरपूरात भाजपला ‘समाधान’! राष्ट्रवादीचा टप्प्यात कार्यक्रम कुणी केला?)

चंद्रकांतदादांची मेहनत फळाला आली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली. या निवडणुकीत प्रशांत परिचारक, उमेश परिचारक हे राम-लक्ष्मणासारखे उमेदवारांसोबत होते. पक्षाचे आमदार, खासदार, दोन्ही माजी मंत्री सुभाषबापू देशमुख, विजयराव देशमुख, निवडणूक प्रभारी, खा. रणजित नाईक निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, कल्याण शेट्टी या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.