Devendra Fadnavis : जपानमध्ये ‘जय भवानी-जय शिवाजी’चा गजर, फडणवीसांचे मराठी गीताने स्वागत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत.

136
Devendra Fadnavis : जपानमध्ये 'जय भवानी-जय शिवाजी'चा गजर, फडणवीसांचे मराठी गीताने स्वागत

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरुन 5 दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले राज्याचे (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टोकियो येथे आगमन होताच मोठ्या संख्येने जमलेल्या मराठी बांधवांनी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र’ असे नारे देत, पारंपारिक मराठी वेषात त्यांचे स्वागत केले. जणू जपानमध्ये महाराष्ट्र साकारला होता.

मराठी बांधवांच्या स्वागतानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थितांशी छोटेखानी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुमच्या स्वागतामुळे जपानमध्ये नाही तर मी मुंबई किंवा पुण्यात आलो, असे मला वाटते आहे. तुम्ही सर्वांनी मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा गौरव हा सातासमुद्रापलिकडे जिवंत ठेवला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे, त्यामुळे जपानमध्ये शिवजयंतीसाठी सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येईल, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या मराठी बांधवांना आश्वस्त केले. यावेळी उपस्थितांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, 2022 पासून जपानमध्ये आम्ही शिवजयंती साजरी करीत आहोत. यात जपान सरकारचे योगदान आहे आणि आता तर पालखी काढण्यासाठी सुद्धा परवानगी देण्यात आली आहे.

जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवशी टोकियोतील इंडिया हाऊसमध्ये प्रामुख्याने जी चर्चा झाली, त्यात अधिकाधिक जपानी कंपन्यांना महाराष्ट्रात (Devendra Fadnavis) आणणे, मराठी विद्यार्थ्यांना जपानमध्ये अधिक शैक्षणिक संधी आणि जपानमधील मराठी उद्योजकांच्या विकासासाठी पाऊले उचलणे, इत्यादी बाबतीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. टोकियो विमानतळावर आगमन होताच जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर शिकान्सेन बुलेट ट्रेनने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी क्योटोपर्यंतचा प्रवास केला. याठिकाणी उल्लेखनीय बाब म्हणजे टोकियो ही जपानची विद्यमान राजधानी आहे, तर क्योटो ही प्राचीन राजधानीचे शहर आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde : केईएम रुग्णालयाच्या सहा वाॅर्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

क्योटो येथे कौन्सुल जनरल निखिलेश गिरी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्वागत केले. वाकायामा प्रिफेक्चरचे आंतरराष्ट्रीय कामकाज संचालक योशियो यामाशिता तसेच ‘असोशिएशन ऑफ फ्रेंडस ऑफ जपान’चे अध्यक्ष समीर खाले तसेच इतर प्रतिनिधी सुद्धा यावेळी उपस्थित होते. क्योटो येथे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आघाडीच्या उद्योजकांच्या भेटी घेतल्या. हे सर्व उद्योजक क्योटो, ओसाका आणि कांसाई क्षेत्रातील आहेत. यात सुरेश लाल, राम कलानी, भावेन जव्हेरी, गुरमित सिंग, श्यामसिंग राजपुरोहित, सत्येन बंडोपाध्याय, शितोरु रॉय, सुरेश नरसिंहन, माकी केईजी, मोहन गुलराजानी, दीपक दातवानी, अजयकुमार नामा, अमित त्यागी, मानवेंद्र सिंग, चैतन्य भंडारे तसेच समीर खाले इत्यादींचा समावेश होता.

या उद्योजकांना संबोधित करताना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पहिल्याच दिवशी मला जपानची सांस्कृतिक राजधानी असलेल्या क्योटोला भेट देण्याची संधी मिळाली. गेल्या 9 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत आणि जपान संबंध नव्या उंचीवर गेले आहेत. जपानच्या उद्योजकांना महाराष्ट्रात अनेक उत्तम संधी आहेत. आज महाराष्ट्र हे परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे क्रमांक 1 चे शहर आहे. महाराष्ट्र आणि वाकायामा या दोन प्रांतात तर अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. येणार्या काळात नवी मुंबई विमानतळ सुरु होते आहे, त्यामुळे जपानसाठी आणखी उड्डाणे सुरु करण्यास मदत होईल. जपानची आर्थिक राजधानी असलेल्या ओसाका येथील भारतीयांना त्यामुळे मोठी मदत मिळेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.